लाडकी बहीण योजना

आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व महिला वर्गासाठी शासनाने माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत आपल्या सर्व  महिलांना दरवर्षी 18,000 रुपये देण्याचा शासनाने निर्णय घेतला.

यामध्ये आपल्याला स्वतःच्या आधार लिंक केलेल्या सक्षम  बँक खात्यात डीबीटी (DBT) द्वारे दरमहा 1,500 रुपये इतकी रक्कम दिली जाईल.

जर आपण महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 यावर या वर्षे वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला असेल तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला असाल तर आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता.

पात्रता:

  • आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे
  • राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परिकथा आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला असणे गरजेचे आहे
  • आपण किमान वयाचे 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाचे 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ घेऊ शकता
  • आपल्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये अडीच लाखापेक्षा जास्त नसावे

आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड 
  • आधार कार्ड लिंक केलेले बँक खाते तपशील
  • लाभार्थी महिलेचे हमीपत्र व फोटो 
  • वार्षिक उत्पन्न रुपये अडीच (रु. 2,50,000) लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. पिवळे अथवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.पांढरे रेशन कार्ड असल्यास अथवा कोणतेही रेशन कार्ड नसल्यास वार्षिक उत्पन्न रुपये अडीच (रु. 2,50,000) लाखांपर्यंत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक 
  • अधिवास प्रमाणपत्र,जर प्रमाणपत्र नसेल तर खालीलपैकी कोणताही एक कागदपत्र असावे :15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड अथवा 15 वर्षांपूर्वीचे मतदार ओळखपत्र अथवा जन्म प्रमाणपत्र अथवा शाळा सोडल्याचा दाखला 
  • महिलेचा जन्म पर राज्यातील असल्यास पतीचे खालीलपैकी कोणताही एक कागदपत्र असावे: 15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड अथवा 15 वर्षांपूर्वीचे मतदार ओळखपत्र अथवा जन्म प्रमाणपत्र अथवा शाळा सोडल्याचा दाखला अथवा  अधिवास प्रमाणपत्र 
  • नवविवाहितेच्या बाबतीत रेशन कार्डवर तिच्या नावाची नोंद नसल्यास विवाह प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहितेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य राहील.

योजनेचे उद्दिष्टे:

  • आपल्या महाराष्ट्र राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे
  • त्यांचे आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करणे.
  • आपल्या महाराष्ट्र राज्यातील महिला स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करणे.
  • आपल्या महाराष्ट्र राज्यातील महिलांना व मुलींना सशक्ति करण्यास चालणा  देणे.
  • आपल्या महाराष्ट्र राज्यातील महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे.

अर्ज प्रक्रिया:

  • आपण शासनाच्या ladakibahin.maharashtra.gov.in  वर ऑनलाईन अर्ज  करू शकता.
  • ज्या महिलेस ऑनलाइन अर्ज करता येत नसेल, त्यांना अंगणवाडी सेविका / पर्यवेक्षिका / मुख्य सेविका / सेतू सुविधा केंद्र / ग्रामसेवक / समूह संसाधन व्यक्ती / आशा सेविका / वार्ड अधिकारी / सी एम एम (सिटी मशीन मॅनेजर) /  मनपा बालवाडी सेविका / मदत कक्ष प्रमुख / आपले सरकार सेवा केंद्र यांचे कडे ऑनलाइन / ऑफलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असेल. या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही
  • अर्जदाराचे नाव, जन्मदिनांक, पत्ता याबाबतची माहिती आधार कार्ड प्रमाणे अचूक भरण्यात यावी तसेच बँकेचा तपशील व मोबाईल नंबर अचूक भरावा.

Leave a Comment